माणुसकीला काळिमा फासणारी घटना : ४४ वर्षांच्या नराधमाचा ; पाळणाघरात ७ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार
माणुसकीला काळिमा फासणारी घटना : ४४ वर्षांच्या नराधमाचा ; पाळणाघरात ७ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार
img
Dipali Ghadwaje

मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका खासगी डे केअर सेंटरमध्ये ७ वर्षीय चिमुरडीवर ४४ वर्षीय व्यक्तीकडून लैंगिक अत्याचार केला आहे. मुंबईतल्या मालाड पूर्व भागात ही घटना घडली आहे.  या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबतची माहिती पीडित चिमुकलीनं आई वडिलांना दिल्यानंतर त्यांनी पोलीस ठाणे गाठत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी चौकशी करत आरोपीला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी सुरू आहे.  

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे मालाड पूर्व येथे डे केअर सेंटर आहे. आरोपी डे केअर आणि ट्युशन चालवायचा. त्याच्याकडे बरेच मुले येत होते. आरोपीच्या घराशेजारी एक ७ वर्षीय चिमुरडी राहत होती. ती आरोपीकडे ट्युशनसाठी यायची.

घटनेच्या दिवशी आरोपी त्या पीडित चिमुरडीला बेडरूममध्ये घेऊन गेला, यानंतर तिच्या हातात मोबाईल दिला. मोबाईलमध्ये गेम चालू करून दिला. तसेच तिच्यावर अत्याचार केला. 

 या घटनेनंतर पीडित मुलगी घरी गेली आणि आई वडिलांना सगळी हकीकत सांगितली. हे ऐकताच पीडितेच्या पालकांना संताप अनावर झाला. त्यांनी थेट दिंडोशी पोलीस ठाणे गाठले. तसेच आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. इतर पालकांनी देखील पुढाकार घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. 

पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. आरोपीला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सध्या आरोपी दिंडोशी पोलिसांच्या ताब्यात असून, त्याने आणखी किती चिमुकल्यांसोबत असे कृत्य केलं आहे, याबाबतचा तपास सुरू आहे.  

इतर बातम्या
Join Whatsapp Group