नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल, अशी दहशत निर्माण करून एका कारसह आठ मोटारसायकलींची तोडफोड करून नुकसान करणाऱ्या दोन तरुणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी जनदयाल मंगलाराव मनेठिया (रा. नवश्या बाबानगर, पाथर्डी गाव) यांच्या ओळखीचे आरोपी मान्या व साईबाबा (दोघांची पूर्ण नावे व पत्ते माहीत नाहीत) यांनी फिर्यादीच्या घरासमोर येऊन गल्लीत गोंधळ घातला. लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल, अशी दहशत निर्माण करून फिर्यादी यांची एमएच 12 सीके 7534 या क्रमांकाची सॅन्ट्रो कार, संतोष यादव यांच्या एमएच 15 एचएन 967, एमएच 15 जीपी 2403, एमएच 15 बीआर 4560 या क्रमांकांच्या मोटारसायकलींसह गल्लीतील इतर लोकांच्या सात ते आठ मोटारसायकलींची दगडाने व लाकडी दांड्याने तोडफोड करून नुकसान केले, तसेच गल्लीतील रहिवाशांना शिवीगाळ करीत धमकी देऊन पळून गेले.
या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस हवालदार देवरे करीत आहेत.