नाशिक : मनी लॉण्डरिंग प्रकरणात अटकेची भीती दाखवून नऊ लाखांची फसवणूक
नाशिक : मनी लॉण्डरिंग प्रकरणात अटकेची भीती दाखवून नऊ लाखांची फसवणूक
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- मनी लॉण्डरिंग प्रकरणात संशयित म्हणून अटकेची भीती दाखवून एका इसमास सायबर भामट्यांनी नऊ लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी हे दि. 7 फेब्रुवारी रोजी घरी होते. त्यावेळी दोन वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून फिर्यादींना फोन आले.त्यावरून बोलणार्‍या व्यक्तीने व्हॉट्सअ‍ॅप, व्हाईस कॉल व व्हिडिओ कॉल करणार्‍या व्यक्तीने आपले नाव बालसिंग राजपूत असल्याचे सांगितले.

या इसमाने क्राईम ब्रँचमधून बोलत असल्याचे भासविले, तसेच फिर्यादी यांचा मोबाईल क्रमांक नरेश गोयल मनी लॉण्डरिंग या प्रकरणामध्ये संशयित म्हणून आढळला आहे. जर तुम्हाला यातून सुटका करून घ्यायची असेल, तर तुमच्या बँक खात्यांमध्ये जमा असलेली रक्कम ही आम्ही सांगितल्याप्रमाणे बँक खात्यात वर्ग करा, असे सांगितले.

त्यानुसार फिर्यादीला विविध खात्यांमध्ये नऊ लाख रुपये भरण्यास सांगून आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी फसवणुकीची रक्कम वर्ग झालेले बँक, वॉलेटधारक व नमूद मोबाईल नंबरधारक यांच्याविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिसे करीत आहेत.
इतर बातम्या
उद्या

गंगापूर धरण

Join Whatsapp Group