नाशिक : विवाहितेचा छळ करून दुसर्‍या मुलीसोबत लग्न, पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
नाशिक : विवाहितेचा छळ करून दुसर्‍या मुलीसोबत लग्न, पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : पहिल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्याकडे फारकतीची मागणी करून दुसर्‍या मुलीसोबत लग्न करणार्‍या पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादीचे डीजीपीनगर परिसरात माहेर आहे. ही विवाहिता जानेवारी 2020 ते 24 जुलै 2025 या कालावधीत माहेरी व श्रमिकनगर येथे सासरी नांदत होती. त्यादरम्यान तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन फिर्यादीच्या पतीचे जातीतील मुलीसोबत लग्न करण्यासाठी फिर्यादीने पतीपासून फारकत घ्यावी, या कारणातून विवाहितेला पती, सासू, सासरे, चुलतदीर, नणंद व नंदोई यांनी संगनमत करून मारहाण व शिवीगाळ केली, तसेच नणंद व नंदोई यांनी धमकी देऊन वेळोवेळी चिथावणी देऊन विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. 

पतीने पत्नी हयात असताना दुसर्‍या मुलीसोबत लग्न करून घेतले. या छळाला कंटाळून अखेर पीडितेने गंगापूर पोलीस ठाण्यात छळवणुकीची फिर्याद दिली असून, पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार पाटील करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group