नाशिक : हृदयद्रावक ,आजारपणाला कंटाळून महिलेची आत्महत्या
नाशिक : हृदयद्रावक ,आजारपणाला कंटाळून महिलेची आत्महत्या
img
वैष्णवी सांगळे
नाशिक येथे हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आजारपणाला कंटाळून एका महिलेने आत्महत्या केली आहे.  सारूळ विल्होळी येथे रहाणाऱ्या २३ वर्षीय अश्विनी पप्पू फडोळ या महिलेने आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. अश्विनी फडोळ हीचा मृत्यूदेह गंगापूर धरण येथे मिळून आला आहे. मृत महिला १० फेब्रुवारी रोजी मिसिंग झाल्याशी तक्रार अंबड पोलीस ठाणे येथे दाखल होती.  

आज सकाळच्या सुमारास डॅम परिसरात असलेले सिक्युरिटी गार्ड यांना मृतदेह दिसल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच  पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अनेक दिवसापासून अश्विनी फडोळ या  आजारी होत्या. त्यांना स्पर्श हॉस्पिटल येथे ऍडमिट देखील केलेलं होतं, मात्र वारंवार तोच आजार तो त्रास सहन करून त्या कंटाळल्या होत्या ज्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असे नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group