नाशिक शहर व जिल्ह्यात कुठेही पेट्रोल टंचाई नसून सुरळीत पुरवठा होत असल्याची माहिती नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने देण्यात आली आहे. सोशल मीडियावर येत असलेल्या मेसेजवर अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये असे आवाहन या असोसिएशन तर्फे करण्यात आले आहे.
सोशल मीडियावरील अफवांमुळे पेट्रोल पंपांवर होणाऱ्या अनियंत्रित गर्दी बाबत आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत आज असोसिएशनच्या सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर माहिती दिली.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की सध्या निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया व विविध माध्यमातून इंधनाच्या संभाव्य टंचाई बाबत अफवा पसरत आहेत. राज्य व राज्यातील पेट्रोल पंपांवरील गर्दीचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असल्याने सर्व सामान्य नागरिकांमध्ये इंधन संपण्याची भीती निर्माण झाली आहे.
त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपांवर गर्दी करत आहेत. एका पंपावर अचानक वाढलेला मागणीमुळे या पंपावरील इंधन लवकर संपते आणि त्यामुळे इतर पंपांवरही अतिरिक्त ताण येऊन तेथेही तो तेवढा निर्माण होतो अशा प्रकारे संपूर्ण पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातून अशा प्रकारचे मेसेज वायरल होत आहे.
सरकार व तेल कंपन्यांकडून वेळोवेळी इंधनाचा तोतवडा नसल्याचे जाहीर केले जात असले तरी प्रत्यक्षात नाशिक जिल्ह्यातील मनमाड डेपो येथून होणाऱ्या पुरवठ्यामध्ये अडचणी येत असल्याचे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तेल कंपन्यांनी पेट्रोल पंपांना दिले जाणारे क्रेडिट बंद केले डीलर्सला आगाऊ पैसे भरूनही वेळेत पेट्रोल उपलब्ध होत नसल्याची वस्तुस्थिती त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडली.
नागरिकांनी कोणताही अफवांवर विश्वास न ठेवता पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी करू नये असे आवाहन असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष विजय ठाकरे, उपाध्यक्ष तेहसीन खान, उपाध्यक्ष दिनेश धात्रक, ज्येष्ठ डीलर सुरेश पाटील, मनोज चांडक, सचिव अमोल बनकर, सचिव सुदर्शन पाटील व हेमचंद्र मोरे उपस्थित होते