लोकांचं भविष्य सांगण्याचा दावा करणारा स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात याच्या कारनाम्यांनी अख्खा महाराष्ट्र हादरला आहे. अशोक खरात याचा राज्यातील बड्या नेत्यांशी संबंध असल्याने या प्रकरणाने राज्यात खळबळ उडालीय. अशोक खरात सध्या पोलीस कोठडीत आहे. न्यायालयाने खरात याला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. दरम्यान याप्रकरणाचा तपास जसजसा पुढ सरकत आहे, तसतशी लिंगपिसाट खरातच्या कारनाम्यांची धक्कादायक माहिती उघड होत चालली आहे.
अशोक खरातच्या लैंगिक शोषणाचा पॅटर्न समोर
महिलेने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये (FIR) म्हटलं आहे की, अशोक खरात हा स्वतःला कृष्णाचा अवतार सांगायचा. 'मी कृष्णाचा अवतार आहे, तू मागच्या जन्मातील माझी राधा होती, असंही तो महिलांना सांगायचा. महिलेच्या डोक्यावर तांब्या-लोटा ठेऊन कॅप्टन खरात कानाजवळ पुटपुटायचा, त्यापूर्वी तो पेढा आणि कडवट - खारट चव असलेलं पाणी प्यायला द्यायचा. महिलांना गायत्री मंत्री म्हणायला लावायचा आणि लागलीच स्पर्श करायला सुरुवात करायचा. महिलेसोबत आलेल्या व्यक्तींना ध्यानस्थ पूजेच्या नावाखाली केबिन बाहेर ठेवायचा. महिलांना गुंगी आली की त्यांचं लैंगिक शोषण करायला सुरूवात करायचा.
सध्या लैंगिक शोषणाच्या आरोपात कॅप्टन खरात नाशिक पोलिसांच्या अटकेत आहे. १०० हुन अधिक लैंगिक शोषणाचे सीसीटीव्ही फुटेज असल्याची माहिती समोर आली आहे. कॅप्टन खरातकडे अनेक राजकीय, कलाकार, उद्योजक आणि सामाजिक क्षेत्रातील मंडळींचा राबता असायचा तेही समोर आले आहे.अनेक नेतेमंडळींसोबत खरातचे फोटो व्हिडीओ समोर आले आहेत.