नाशिकमधील बहुचर्चित अशोक खरात उर्फ कॅप्टन या भोंदूगिरी करणाऱ्या मांत्रिकाला क्राइम ब्रांच युनिट एकने अटक केली. या भोंदूबाबाला आज नाशिक जिल्हा न्यायालयात हजर केले गेले. या मांत्रिकाने गुंगीचे औषध देऊन एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आज पहाटे अशोक खरात याला अटक करण्यात अली होती. खरातच्या अटकेनंतर पोलिसांनी त्याच्या विविध ठिकाणांवर शोध मोहीम राबवली असता तपासात तब्बल ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले आहेत. खरात यास अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. चौकशीनंतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.अशोक खरातला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवार (दि.२४ मार्च) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.