नाशिक : दस्त नोंदणीसाठी सुटीच्या 'या' ४ दिवशी निबंधक कार्यालये रहाणार सुरू
नाशिक : दस्त नोंदणीसाठी सुटीच्या 'या' ४ दिवशी निबंधक कार्यालये रहाणार सुरू
img
वैष्णवी सांगळे
नाशिक : आर्थिक वर्ष समाप्ती तसेच नूतन वर्षानिमित्त नागरिकांचा मालमत्ता खरेदी करण्याकडे जास्त कल असल्यामुळे  दस्त नोंदणीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय वर्षाअखेरचा इष्टांक पूर्ण करण्याच्या दृष्टीने  26, 28, 29 व 31 मार्च 2026 या चार सार्वजनिक सुटीच्या दिवशी सर्व दुय्यम निबंधक कार्यालये सुरु राहणार आहेत, असे नाशिकचे सह जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी  संदीप आहेर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

शासकीय सुट्टीच्या दिवशी नागरिकांनी त्यांचे दस्त नोंदणीचे काम करून घ्यावे, असे आवाहनही  मुद्रांक जिल्हाधिकारी श्री. आहेर यांनी केले आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group