नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- घराच्या दरवाजाचे लॅचलॉक तोडून अज्ञात चोरट्याने घरातील कपाट उघडून 10 तोळे सोन्याचे तसेच चांदीचे दागिने व रोकड असा सुमारे 6 लाखांचा ऐवज घरफोडी करुन चोरुन नेल्याची घटना गंगापूर रोडवरील सावरकरनगरमध्ये घडली.
फिर्यादी योगेश नानाजी दळवी (रा. लक्ष्मी व्हिला, सावरकरनगर, गंगापूर रोड) यांच्या राहत्या घराच्या दरवाजाचे लॅचलॉक अज्ञात चोरट्याने कशाच्यातरी सहाय्याने तोडून घरात प्रवेश केला.
त्यानंतर बेडरूममध्ये असलेले लाकडी कपाट उघडून त्यातील ड्रॉव्हरमध्ये ठेवलेले 15 ग्रॅम वजनाची 40 हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन, 40 हजार रुपये किंमतीची 15 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, 26 हजार 500 रुपये किंमतीचे 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, 18 हजार 500 रुपये किंमतीचे 7 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, 30 हजार रुपये किंमतीच्या 12 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या 4 लेडीज अंगठ्या, 26 हजार 500 रुपये किंमतीच्या 10 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन जेन्ट्स अंगठ्या, 18 हजार 500 रुपये किंमतीचे 7 ग्रॅमचे मंगळसूत्र, 50 हजार रुपये किंमतीचे 20 ग्रॅम वजनाचे 10 जोड कर्णफुले, 5 हजार रुपये किंमतीचे चांदीचे जोडवे, 25 हजार रुपये किंमतीच्या चांदीच्या पायातील साखळ्या, 7 हजार रुपये किंमतीच्या चांदीच्या अंगठ्या, 3 हजार रुपये किंमतीची चांदीची चेन, 4 हजार रुपये किंमतीचे लहान मुलाचे चांदीचे कडे, 2 हजार रुपये किंमतीचा चांदीचा शिक्का, हजार रुपये किंमतीचा चांदीचा शिक्का, चांदीचा हळदी कुंकवाचा करंडा, 18 हजार रुपये किंमतीचा 8 ग्रॅम वजनाचा सोन्याचा सेट, 20 हजार रुपयांची रोकड व 2 लाख 70 हजार रुपये किंमतीचे 3 हजार अमेरिकन डॉलर असा 6 लाख 5 हजार 500 रुपये किंमतीचा ऐवज भरदुपारी 12 वाजेच्या सुमारास घरफोडी करुन चोरुन नेला.
याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहे.