अशोक खरातच्या जिवाला धोका? SIT नं घेतला मोठा निर्णय
अशोक खरातच्या जिवाला धोका? SIT नं घेतला मोठा निर्णय
img
वैष्णवी सांगळे
महिलांना फसवून, जाळ्यात ओढून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या लिंगपिसाट भोंदू बाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांनी फक्त नाशिकचं नव्हे तर अख्खा महाराष्ट्र हादरलाय. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या भोंदू खरात प्रकरणात एसआयटीकडून तपास सुरू असून खरातशी संबंधित अनेक लोकांची चौकशीही करण्यात येत आहे. 



दरम्यान, खरातला आज पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार होत. मात्र आता सुनावणीसाठी खरातला न्यायालयात आणलं जाणार नाही. खरातला न्यायालयात हजर न करता ऑनलाइन पद्धतीने सुनावणी घेतली जाणार आहे. भोंदू बाबा अशोक खरातच्या जीवाला धोका असल्यानं एसआयटीनं न्यायालयाकडे ऑनलाईन सुनावणी करण्यात यावी असं विनंती केली होती. खरातच्या सुरक्षेच्या कारणास्तव न्यायालयाने एसआयटीची विनंती मान्य केली आहे.

पहिल्या गुन्ह्यातील पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर अशोक खरातला बुधवारी १४दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र तपास अधिकाऱ्यांनी लैंगिक अत्याचाऱ्याच्या दुसऱ्या गुन्ह्यात त्याचा ताबा मिळण्याची विनंती अर्ज सादर केला. त्यानंतर न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर अशोक खरातला मध्यवर्ती कारागृहातून पुन्हा एसआयटीच्या पथकाने ताब्यात घेतलं. आज न्यायालयात सुनावणी होणार होती, मात्र खरातच्या सुरक्षेच्या कारणास्तव न्यायालयाने ऑनलाइन पद्धतीने सुनावणी होणार आहे. एसआयटीने न्यायालयाला सुरक्षेच्या कारणास्तव ऑनलाइन सुनावणी घ्यावी, असे पत्र दिलं होतं.
इतर बातम्या
Join Whatsapp Group