अशोक खरातच्या पोलीस कोठडीत वाढ; न्यायाधीशांसमोर हात जोडून आज खरात काय बोलला ?
अशोक खरातच्या पोलीस कोठडीत वाढ; न्यायाधीशांसमोर हात जोडून आज खरात काय बोलला ?
img
वैष्णवी सांगळे
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. पहिल्या गुन्ह्यातील कोठडी संपल्यानंतर, दुसऱ्या बलात्कार प्रकरणात त्याला आज न्यायालयाने 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नाशिक सत्र न्यायालयाने भोंदू अशोक खरातला बुधवार (दि.८) एप्रिलपर्यंत म्हणजेच सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकारी वकिलांनी खरातची दुसऱ्या गुन्ह्यात चौकशी करायची असल्याने त्याला पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी केली. यानंतर न्यायालयाने वकिलांची विनंती मान्य करत खरातला ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.



सुरक्षेच्या कारणास्तव खरातला न्यायालयात प्रत्यक्ष हजर न करता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (VC) द्वारे हजर करण्यात आले होते.अशोक खरातवर असलेल्या जनक्षोभाचा विचार करता, SIT (विशेष तपास पथक) कडून त्याला प्रत्यक्ष कोर्टात आणणे जोखमीचे होते. त्यामुळे तपास अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांनी केलेल्या अर्जानंतर न्यायालयाने VC द्वारे सुनावणीला परवानगी दिली. कोर्ट रूममध्ये चार मोठ्या स्क्रीन लावण्यात आल्या होत्या, ज्याद्वारे आरोपी खरात, न्यायाधीश आणि कोर्टातील कामकाज एकमेकांना दिसत होते.

कोर्टात खरात काय बोलला ? 
अशोक खरातने गुलाबी रंगाचा टी-शर्ट, वाढलेली दाढी आणि दोन्ही हातावर हात धरून उभा असलेला अशोक खरात VC स्क्रीनवर दिसत होता.
आजच्या ऑनलाईन सुनावणीत अशोक खरात उपस्थित राहिला, तेव्हा न्यायाधीशांनी त्याला नाव विचारले. यावेळी आवाज कमी आल्यामुळे न्यायाधीशांनी अशोक खरातला मोठ्याने बोलण्यास सांगितले. तर पुढे सुनावणीत तुमचे वकील म्हणून भाटे वकील इथे बाजू मांडत आहे तेच तुमचे वकील आहेत का?, असं न्यायाधीशांनी विचारले. यावर हो असं अशोक खरातने उत्तर दिलं. त्यानंतर सुनावणीच्या शेवटी सगळ्यांचा युक्तिवाद झाल्यानंतर तुला काही बोलायचे आहे का?, असा प्रश्न न्यायाधीशांनी विचारला. यावर हात जोडून काही नाही, असं अशोक खरात म्हणाला.

खरातच्या वकिलांनी 7 दिवसांच्या कोठडीला विरोध केला. ही घटना 2022 मधील असून याआधी 14 दिवस कोठडी झाली आहे, त्यामुळे पुन्हा कोठडीची गरज नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला. मात्र, गुन्ह्याचे गांभीर्य आणि मास्टरमाईंड खरातची मोडस ऑपरेंडी लक्षात घेता न्यायालयाने त्याला 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group