विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीतील फॉर्म्युला ठरला; नाशिकची जागा
विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीतील फॉर्म्युला ठरला; नाशिकची जागा "या" पक्षाला?
img
दैनिक भ्रमर

स्थानिक स्वराज्य मतदार संघातून होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीतील फॉर्म्युला ठरल्याचे समजते.

एकूण १७ जागांपैकी भाजपला ११, शिवसेना ४, राष्ट्रवादीला २ जागा असा फॉर्म्युला ठरल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. भाजपच्या ११ जागांमध्ये सोलापूर, जळगाव, भंडारा-गोंदिया, वर्धा-चंद्रपूर- गडचिरोली, अमरावती, धाराशिव-लातूर -बीड, नागपूर, छ. संभाजीनगर-जालना, अहिल्यानगर, सांगली-सातारा व नांदेड या अकरा जागांचा समावेश आहे.

शिवसेनेच्या वाट्याला ठाणे, नाशिक, परभणी व यवतमाळ या चार जागा आल्या असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला पुणे व कोकण अशा दोन जागा निश्चित करण्यात आल्याचे समजते.

इतर बातम्या
Join Whatsapp Group