90 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात
90 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात
img
दैनिक भ्रमर


नाशिक :- एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 90 हजार रुपयांची लाच घेताना पोलिस अंमलदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.

मनोज भगु गायकवाड (वय 37) असे लाच घेणाऱ्या पोलिस अंमलदाराचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी ही तक्रारदार यांचा गुजरात राज्यातील सुतारपाडा येथे चिकन विक्रीचा व्यवसाय आहे. तक्रारदार या व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या कोंबड्यांची खरेदी करून ते गुजरात राज्यातील सुतारपाडा या गावात त्यांच्या स्विफ्ट कारणे कोंबड्या नेत होते.

तक्रारदार हे जून महिन्यात त्यांच्या व्यवसायाकरिता कोंबड्या खरेदी करून घेऊन जात असताना वांगणी परिसरात पेठ पोलीस ठाण्याचे पोलिस अंमलदार मनोज गायकवाड यांनी तक्रारदार यांचे वाहन अडवून त्यांना तो गुटख्याची तस्करी करतो असे सांगून तुझ्यावर गुन्हा दाखल करतो असे सांगितले. मी असा कोणताही व्यवसाय करत नाही म्हणून तक्रारदार यांनी पोलिस अंमलदाराला सांगितले.

माझे गुजरात राज्यात चिकनचे शॉप आहे. मी गुजरात येथे जात असतो, असे गायकवाडला सांगितले. त्यांचे काही एक न ऐकता तू बंदी असलेल्या गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करतो, तुझ्या चिकनची वाहतूक करणाऱ्या गाड्या यादेखील अवैधरित्या वाहतूक करत आहे असे सांगून तुझ्यावर गुन्हा दाखल करायचा नसेल तर मला पैसे द्यावे लागतील असे त्याने सांगितले.

तुझ्या घरच्यांचे पेठ तालुक्यात चांगले नाव आहे. तुझ्यावर गुन्हा दाखल केला तर त्यांची इज्जत जाईल, असे सांगून त्याने तक्रारदाराकडून 60000 रुपये घेतले होते. त्यानंतर 5 जुलै रोजी आरोपी गायकवाड याने तक्रारदार यांना फोन करून त्यांच्या अवैधरित्या सुरू असलेल्या गुटख्या आणि कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या गाड्या सुरळीत चालू देणे आणि गुन्हा दाखल न करण्यासाठी 6 जुलै रोजी पेठ येथील तोंडवळ फाटा येथे बोलाविले.

तक्रारदार यांना गायकवाडला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे गायकवाड यांच्याबाबत तक्रार केली. या तक्रारीच्या अनुषंगाने सापळा रचला असला 90000 रुपयांची लाच घेताना त्याला रंगेहात पकडण्यात आले.

इतर बातम्या
गंगापूर धरण

Join Whatsapp Group