Nashik Crime : करन्सी एक्स्चेंज करून देण्याच्या बहाण्याने साडेतीन कोटींची फसवणूक
Nashik Crime : करन्सी एक्स्चेंज करून देण्याच्या बहाण्याने साडेतीन कोटींची फसवणूक
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- इंडियन करन्सीचे रशियन करन्सीमध्ये एक्स्चेंज करून देण्यासाठी दिलेले सुमारे साडेतीन कोटी रुपये परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी एका इसमाला अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आरोपी शुभम् राकेश सिंग (रा. कमल रो-हाऊस, ज्ञानेश्वरनगर, पाथर्डी फाटा) याने फिर्यादी पृथ्वीराज पद्मसिंह चांडे (रा. चांडेवाडी, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) यांचे वडील पद्मसिंह चांडे यांचा विश्वास संपादन करून इंडियन करन्सीचे रशियन करन्सीमध्ये एक्स्चेंज करून देण्यासाठी त्याला चेपॉक्सरी युनिर्व्हसिटीने प्राधिकृत केल्याचे बनावट पत्र दाखविले. 

त्याद्वारे फिर्यादीच्या वडिलांचा, तसेच फिर्यादीचा विश्वास संपादन करून सुरुवातीला काही रक्कम रशियन करन्सीमध्ये एक्स्चेंज करून दिली. त्यानंतर नोव्हेंबर ते डिसेंबर २०२५ च्या दरम्यान आरोपी शुभम् सिंग याने फिर्यादीने स्वत: दिलेले सात लाख रुपये व त्यांच्या आठ मित्रांनी फिर्यादीकडे दिलेले ५३ लाख रुपये, तसेच चेपॉक्सरी युनिर्व्हसिटीतील इतर आठ विद्यार्थ्यांनी दिलेले २ कोटी ८८ लाख रुपये असे एकूण ३ कोटी ४८ लाख रुपये इंडियन करन्सीचे रशियन करन्सीमध्ये एक्स्चेंज करून देण्यासाठी फिर्यादीसह त्याच्या मित्रांकडून ही रक्कम घेतली; मात्र आजपावेतो ही रक्कम शुभम् सिंग याने एक्स्चेंज करून दिली नाही अथवा ही रक्कम फिर्यादीसह त्याच्या मित्रांना परत न करता आर्थिक फसवणूक केली आहे. 

फिर्यादी पृथ्वीराज चांडे हे रशियामध्ये असल्याने व त्यांची परीक्षा चालू असल्याने ते भारतात परतल्यानंतर त्यांनी आरोपी शुभम् सिंग याच्याविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दिली असून, शुभम् सिंग याला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार मे २०२३ ते दि. २८ जुलै २०२६ या कालावधीत घडला.  तपास पोलीस उपनिरीक्षक कुंदे करीत आहेत.
इतर बातम्या
उद्या

गंगापूर धरण

Join Whatsapp Group