संतापजनक !  कॅब चालकाचा  महिला प्रवाशावर अत्याचाराचा प्रयत्न ! ड्रायव्हरनं निर्जनस्थळी गाडी थांबवली अन्..
संतापजनक ! कॅब चालकाचा महिला प्रवाशावर अत्याचाराचा प्रयत्न ! ड्रायव्हरनं निर्जनस्थळी गाडी थांबवली अन्..
img
Nandini khandare More

राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असून आता सध्या  एकट्यात प्रवास करणे सुद्धा महिलांसाठी धोक्याचे ठरत आहे. आता अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील एका निर्जन रस्त्यावर रात्रीच्या वेळी एका कॅब चालकाने महिला प्रवाशावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली. पीडित महिला चेंबूरहून पनवेलच्या दिशेने जात असताना तिच्यासोबत हा संतापजनक प्रकार घडला. या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी कॅब चालकाचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला चेंबूर येथे एका पार्टीसाठी गेली होती. तिथून पनवेल येथील तिच्या घरी परतण्यासाठी मित्राने तिला कॅब बुक करून दिली. प्रवासादरम्यान, नवी मुंबईत पोहोचल्यानंतर चालकाने पाणी पिण्याच्या बहाण्याने एका निर्जन रस्त्यावर गाडी थांबवली, तो थोडा वेळ बाहेर आला आणि त्यानंतर कारच्या मागच्या सीटवर महिलेच्या शेजारी जाऊन बसला. त्याने महिलेचा हात पकडला आणि तिचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला. महिलेने कशीबशी आपली सुटका करून घेतली आणि आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. त्यानंतर तक्रार नोंदवण्यासाठी पनवेल पोलीस ठाणे गाठले. ही घटना नवी मुंबई विमानतळ प पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने, पनवेल पोलिसांनी महिलेला संबंधित पोलीस ठाण्यात नेले.


नवी मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, महिलेच्या तक्रारीवरून नवी मुंबई विमानतळ पोलिसांनी मोहम्मद अफझल शेख नावाच्या आरोपी कॅब चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. ही घटना विमानतळ सर्व्हिस रोडवर रात्री सुमारे १:३० वाजता घडली. पोलिसांनी फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली असून, तांत्रिक इंटेलिजन्सचावापर करून त्याचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नवी मुंबई पोलीस करत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group