पुढील सात राज्यात पावसाचा तडाखा ! काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी...
पुढील सात राज्यात पावसाचा तडाखा ! काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी...
img
Nandini khandare More

जुलै महिन्यात घमासान घातलेल्या पावसाने ऑगस्ट महिन्यात काहीशी दडी मारली होती परंतु आता विश्रांती घेतलेला पाऊस राज्यात एकदा पुन्हा हजेरी लावणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पुढील काही दिवस राज्याच्या पश्चिम भागातील कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मात्र, कोकण-गोवा परिसरात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस सुरू राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

आज 7 सप्टेंबरला कोकण-गोवा भागात पावसाची शक्यता कायम आहे. त्यानंतरच्या काही दिवसांत उत्तर कोकणात अनेक किंवा बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. 8 आणि 9 सप्टेंबर रोजी उत्तर कोकणात बहुतांश ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक पाऊस पडेल असे म्हटले जात आहे. 

10 सप्टेंबर रोजी देखील दक्षिण कोकण-गोव्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला जात आहे. 

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पुढील 48 तास आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शहरात कमाल तापमान सुमारे 31 ते 32 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 25 ते 26 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे. एकंदरीत राज्यात सध्या चांगल्या पावसासाठी प्रभावी हवामान प्रणाली सक्रिय नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पुढील 4-5 दिवस राज्यात कुठेही मोठा पावसाचा अलर्ट नाही. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group