22 वर्षीय इंजिनिअर तरुणीची निर्घृण हत्या! प्लास्टिकच्या पिशव्या, चार्जर केबल अन् शॉर्ट्सच्या नाडीचा वापर; कुठे घडली घटना ?
22 वर्षीय इंजिनिअर तरुणीची निर्घृण हत्या! प्लास्टिकच्या पिशव्या, चार्जर केबल अन् शॉर्ट्सच्या नाडीचा वापर; कुठे घडली घटना ?
img
Nandini khandare More
सध्या गुन्हेगारीच्या प्रमाणात चिंताजनक वाढ झाली असून या वाढत्या गुन्ह्यांचे स्वरूप अधिकच गंभीर आणि भयावह होत चालले आहे. हत्ये सारख्या गंभीर घटना देखील अगदी सर्रासपणे घडत आहेत. दरम्यान आता अशीच एक घटना आता उघडकीस आली आहे. 

गुजरातच्या सुरत जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील गोडावडी गावात राहणाऱ्या निधी पटेल (वय २२) या संगणक अभियंता (कॉम्प्युटर इंजिनिअर) तरुणीची ) अत्यंत अमानुषपणे तिच्याच घरामध्ये हत्या (Gujrat Crime News) करण्यात आली आहे. घटनेला आठवडा उलटूनही पोलिसांना अद्याप आरोपीचा कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही. निधीचा मृतदेह २४ ऑगस्टच्या सकाळी तिच्या राहत्या घराच्या गच्चीवर आढळून आला होता. ही घटना घडली त्यावेळी ती घरी एकटीच होती, आईवडील तीर्थयात्रेला गेले होते, घरी परतल्यानंतर त्यांना निधीचा मृतदेह आढळून आला.

तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मारेकऱ्यांनी अत्यंत क्रूरपणे निधीची हत्या केली. आरोपीने शॉर्ट्सची नाडी आणि मोबाईल चार्जरच्या केबलने तिचा गळा आवळला होता. इतकेच नाही तर, तिच्या तोंडावर दोन प्लास्टिकच्या पिशव्या बांधून तिचे तोंड बंद करण्यात आले होते. धक्कादायक बाब म्हणजे, निधीच्या गुप्तांवर जखमांच्या खुणा आढळून आल्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय अधिक बळावला आहे. हत्येनंतर घराचा पुढचा दरवाजा आतून बंद होता, तर मागचा दरवाजा उघडा असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

ज्या वेळी ही भयानक घटना घडली, त्या वेळी निधी घरात एकटीच होती. तिचे आई-वडील तीर्थयात्रेला गेले होते. तीर्थयात्रेवरून परत आल्यानंतर जेव्हा आई-वडिलांनी घरात प्रवेश केला, तेव्हा त्यांना आपल्या तरुण लेकीचा मृतदेह गच्चीवर पडलेला दिसला. या घटनेच्या आघातातून कुटुंब अद्याप सावरू शकलेले नाही. ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे.

घटनास्थळाचा पंचनामा करताना पोलिसांना घराचा दरवाजा जबरदस्तीने तोडल्याचे किंवा घरात जबरदस्तीने प्रवेश केल्याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. त्यामुळे हत्येमागचा सूत्रधार निधीच्या ओळखीचाच असावा, असा भक्कम संशय पोलिसांना आहे. ओळखीच्या व्यक्तीनेच संधी साधून हा प्रकार केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सुरुवातीला या प्रकरणाचा तपास मांडवी पोलीस करत होते. मात्र, तपासात कोणतीही ठोस प्रगती किंवा दुवा न मिळाल्याने सुरतचे पोलीस अधीक्षक (SP) राजेश गढिया यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले. मांडवी विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक (ASP) अक्षेश इंजिनिअर यांच्या नेतृत्वाखाली ही 'एसआयटी' काम करत असून त्यात सुमारे ६० पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मात्र, एसआयटीच्या तपासाला ४ दिवस उलटूनही आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

सध्या पोलीस घटनास्थळावरून मिळालेले बोटांचे ठसे (फिंगरप्रिंट्स), निधीचे हालचालविषयक तपशील, तिचे हालचे कॉल रेकॉर्ड्स, मेसेज आणि व्हॉट्सॲप चॅट (WhatsApp Chats) यांची अत्यंत बारकाईने सखोल तपासणी करत आहेत. तपासाचे अनेक धागेदोर हाताळले जात असले तरी अजूनही पोलिसांना स्पष्ट दिशा मिळालेली नाही. दरम्यान, प्रकरणाचे संवेदनशीलता लक्षात घेता पोलीस सध्या कोणत्याही संशयितांची नावे जाहीर करत नाहीत. पोलीस यंत्रणा वेगाने तपास करत असून लवकरच या हत्येचा उलगडा होईल आणि मुख्य आरोपी पोलिसांच्या जाळ्यात असेल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group