राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणवीर असून अत्याचाराच्या घटना घडत असून आता रायगडमधून एक हादरवणारी घटना घडली आहे. रायगडमध्ये १७ वर्षीय मुलीवर ५ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. ५ आरोपींमध्ये २ आरोपी अल्पवयीन आहेत. या घटनेमुळे रायगड जिल्हा हादरला आहे. पोलिस सध्या या घटनेचा तपास करत आहेत.
रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात एका १७ वर्षीय मुलीवर ५ जणांनी वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी म्हसळा पोलिस ठाण्यात पाचही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
पीडित मुलीच्या तक्रारीनुसार, तिच्या मित्राने तिला धमकावून आणि फसवून वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी म्हसळा पोलिस ठाण्यात ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पाचही आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे पाच आरोपींपैकी २ आरोपी हे अल्पवयीन आहेत. राज्याच्या महिला बाल कल्याण विभागाची जबाबदारी असणाऱ्या आदिती तटकरे यांच्या मतदार संघात महिला, लहान मुली सुरक्षित नसल्याने संताप व्यक्त होत आहे.