गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात अनेक धक्कादायक घटना उघडकी येत असून आता एका आश्रमशाळेतून एक खळबळजनक घटना समोर आली आहे.
नंदुरबारमध्ये आश्रम शाळेत विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील अक्राणी अनुदानित आश्रम शाळेत ही घटना घडली. औषध घेतल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. धडगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी धडगाव रुग्णालयाबाहेर आक्रोश केला.
मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील अक्राणी अनुदानित आश्रम शाळेतील विद्यार्थिनीने आत्महत्या केली. . या आश्रम शाळेमध्ये शिकणाऱ्या १६ वर्षीय दहावीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. तिने औषध पिऊन आयुष्य संपवलं. औषध प्यायल्यानंतर तिची प्रकृती खालावली. त्यानंतर तिला धडगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.नंदुरबार आश्रम शाळेत दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू
नोक्या पावरा असं मृत विद्यार्थिनीचे नाव होते. ती धडगाव तालुक्याती शेलकुई गावाची रहिवासी होती.विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर धडगाव रुग्णालयाबाहेर नातेवाईकांनी आक्रोश केला. या विद्यार्थिनीच्या आत्महत्येमुळे एकच खळबळ उडाली. विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल का उचलले यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट सापडली नाही. याप्रकरणी धडगाव पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.