मोठी बातमी ! ठाकरे गटाच्या आमदाराच्या कारची  पादचाऱ्याला धडक
मोठी बातमी ! ठाकरे गटाच्या आमदाराच्या कारची पादचाऱ्याला धडक
img
Nandini khandare More

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार सुनील प्रभू यांच्या कारने एका पादचाऱ्याला धडक दिल्याची दुर्घटना समोर आली आहे. मुंबईतील विलेपार्ले परिसरात ही घटना घडली असून, या अपघातात पादचारी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघातात पादचारी व्यक्ती किरकोळ जखमी झाला असून नील धुलविया असे जखमी इसमाचे असल्याची माहिती आहे.अपघात झाला तेव्हा आमदार सुनील प्रभू गाडीत होते आणि त्यांचा ड्रायव्हर गाडी चालवत होता. 

समोर आलेलया माहितीनुसार ,  मुंबई एअरपोर्टवरून कांदिवलीच्या दिशेने जाताना सुनील प्रभुंच्या गाडीचा धक्का लागून धुलविया जखमी झाला. अपघात झाल्यानंतर सुनील प्रभू यांनी100 नंबरवर पोलिसांना फोन केला. आणि जखमीला रुग्णालयात नेण्यास सांगितलं अशीही माहिती समोर येत आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group