मोठी बातमी ! शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं ? दसऱ्यानंतर 'या' तारखेला लागणार निकाल ?
मोठी बातमी ! शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं ? दसऱ्यानंतर 'या' तारखेला लागणार निकाल ?
img
Nandini khandare More
राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असून आता गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं या वादावर आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. 

 शिवसेना पक्ष तसेच धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयातून महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातील सर्व सुनावणी ३० ऑक्टोबरपर्यंत पूर्ण केली जाईल, असे मौखिक संकेत सर्वोच्च न्यायालयाने आज एका सुनावणीदरम्यान दिले आहेत. त्यामुळे ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात या बहुचर्चित प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यात पोहोचण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात निवडणूक आयोगाच्या वतीने न्यायालयात बाजू मांडली जाईल. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून 'रिजॉइंडर' (प्रत्युत्तर) दाखल केले जाईल आणि त्यांचा अंतिम युक्तिवाद पूर्ण होईल.

आज सर्वोच्च न्यायालयात पश्चिम बंगाल एसआयआर (SIR) प्रकरणाची सुनावणी त्वरित घ्यावी, अशी विनंती वकिलांकडून करण्यात आली होती. त्यावर उत्तर देताना खंडपीठाने स्पष्ट केले की, सध्या ३० ऑक्टोबरपर्यंत शिवसेना प्रकरणाची सुनावणी पूर्ण करायची आहे; ती संपल्यानंतरच पश्चिम बंगालच्या प्रकरणावर सुनावणी घेतली जाईल. यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाचा निकाल आता लवकरच लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group