नाशिक शहरासह जिल्ह्यातील सहा तालुक्यांना भूकंपाचे धक्के
नाशिक शहरासह जिल्ह्यातील सहा तालुक्यांना भूकंपाचे धक्के
img
चंद्रशेखर गोसावी

नाशिक - नाशिक शहरासह जिल्ह्यातील ६ तालुक्यांना आज रात्री भूकंपाचे धक्के जाणविल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.

या सर्व परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी राजपूत यांनी केले आहे.

मागील काही दिवसापासून नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, हरसुल, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील काही भाग या ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवत आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण हे पसरले असतानाच पुन्हा एकदा जिल्ह्यामध्ये भूकंपाचे धक्के जाणविल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाकडून उपलब्ध झालेली आहे.

याबाबत उपलब्ध झालेल्या अधिक माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये भूकंपाचे धक्के आज रात्री १० वाजेच्या सुमारास जाणवले. रिक्टर स्केल वरती 4.3 एवढी नोंद झाली असून भूकंपाचा केंद्रबिंदू हा गुजरात मधील भनवड या ठिकाणी असल्याचे समोर आलेले आहे. 

प्राथमिक उपलब्ध झालेल्या प्राथमिक माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील पेठ, दिंडोरी, कळवण, चांदवड, देवळा आणि नाशिक तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणविले आहेत. नाशिक शहरामध्ये अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणविले. घरातील भांडे , पंखे, खिडक्या वाजल्याचे तसेच काही ठिकाणी तडे गेल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
इतर बातम्या
उद्या

गंगापूर धरण

Join Whatsapp Group