स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलाही नाशिक रोड मनपा विभागीय कार्यालयावर विद्युत रोषणाई नाही; विद्युत विभागाच्या दुर्लक्षाबद्दल संताप
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलाही नाशिक रोड मनपा विभागीय कार्यालयावर विद्युत रोषणाई नाही; विद्युत विभागाच्या दुर्लक्षाबद्दल संताप
img
Chandrakant Barve

नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी):- स्वातंत्र्य दिन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असतानाही नाशिक रोड येथील दुर्गा मंदिराजवळील राजमाता जिजाऊ माँ साहेब  विभागीय कार्यालयावर स्वातंत्र्य दिनानिमित्त करण्यात येणारी आकर्षक विद्युत रोषणाई अद्याप करण्यात आलेली नाही. स्वातंत्र्य दिनाचा राष्ट्रीय उत्सव देशभरात उत्साहात साजरा होत असताना महापालिकेच्या विद्युत विभागाने नाशिक रोड विभागीय कार्यालयावरील विद्युत रोषणाईकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिन हा देशाचा महाउत्सव म्हणून उत्साहात साजरा करण्याचे आवाहन केले आहे. ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रध्वज फडकवून स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशा राष्ट्रीय उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या प्रमुख कार्यालयावर आकर्षक विद्युत रोषणाई करणे अपेक्षित असताना नाशिक रोड विभागीय कार्यालयावर अद्याप रोषणाई करण्यात आलेली नाही.

दरवर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त महापालिकेच्या प्रमुख कार्यालयांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येते. त्यामुळे यंदाही नाशिक रोड विभागीय कार्यालयावर तिरंगी रंगांची विद्युत रोषणाई करण्यात येईल, अशी अपेक्षा होती. मात्र स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलाही विद्युत रोषणाई न झाल्याने महापालिकेच्या विद्युत विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे, नाशिक रोड विभागीय कार्यालयावर विद्युत रोषणाई करण्याबाबत प्रभाग सभापती रमेश धोंगडे यांनी तब्बल पाच दिवसांपूर्वीच विद्युत विभागाचे अधिकारी कुलकर्णी यांना सूचना केली होती. मात्र त्यानंतरही संबंधित विभागाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नसल्याने विद्युत विभागाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे. राष्ट्रीय उत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधीने सूचना करूनही त्याची अंमलबजावणी न होणे ही बाब गंभीर असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

प्रभाग सभापती रमेश धोंगडे म्हणाले, “स्वातंत्र्य दिनानिमित्त नाशिक रोड विभागीय कार्यालयावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात यावी, अशी सूचना मी पाच दिवसांपूर्वीच विद्युत विभागाचे अधिकारी कुलकर्णी यांना केली होती. स्वातंत्र्य दिन हा देशाचा राष्ट्रीय महोत्सव असून तो उत्साहात साजरा करण्याची जबाबदारी प्रशासनाचीही आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा करण्याचे आवाहन केले आहे. असे असताना सूचना करूनही विद्युत रोषणाई न करणे ही गंभीर बाब आहे.
इतर बातम्या
उद्या

गंगापूर धरण

Join Whatsapp Group