‘लाडकी बहीण’ योजनेच्या नावावर आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; नाशिकमधील खळबळजनक घटना
‘लाडकी बहीण’ योजनेच्या नावावर आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; नाशिकमधील खळबळजनक घटना
img
Nandini khandare More
सध्या राज्यासह  शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून फसवणूक , लूटमार, चोरी , मारहाण आणि अत्याचाराच्या घटना सर्रासपणे घडत आहेत. दरम्यान आता नाशिक  मधून  एक धक्कादायक  बातमी समोर आली आहे. चक्क ‘लाडकी बहीण’ योजनेच्या नावावर आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केली असल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. 

राज्यातील लाखो महिलांच्या खात्यात दर महिन्याला लाडकी बहीण योजनेचा १५०० रुपयांचा हप्ता जमा होतो. या पैशातून महिला स्वतःचा खर्च भागवतात. कपडे, भांडी, दागिने सारख्या अनेक गोष्टी स्वतःसाठी खरेदी करतात. मात्र याचाच फायदा घेत नाशिकच्या तरुणाने एका महिलेसोबत संतापजनक कृत्य केलं आहे. या तरुणाने महिलेला लाडक्या बहिणीच्या पैशातून दागिने खरेदी करून देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केले. याप्रकरणी महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना नाशिकच्या अमळनेरमध्ये घडली आहे. सुदाम भगवान भिल असे आरोपीचे नाव आहे. तर पीडित महिलेचे नाव संगीता (बदलेल नाव) असे आहे. संगीताचा पहिल्या नवऱ्यासोबत घटस्फोट झाल्याने ती आई वडिलांकडे माहेरी राहत होती. मार्चमध्ये महिलेकडे लाडकी बहीण योजनेचे ७० हजार रुपये जमले होते..या पैशांचं सोन करून घेऊ असे महिलेला तिची आत्या आणि आत्ये बहीणीने सांगितलं. मार्चमध्ये पीडित महिला उषाबाई, दुर्गाबाई व स्वतःच्या लहान मुलाला घेऊन अमळनेरला निघाले.

त्यानंतर मंगळग्रह मंदिराजवळ उतरल्यावर दुर्गाबाईचा मुलगा सुदाम आला. दुर्गाबाई आणि उषाबाई यांनी सुदामसोबत महिलेला तिच्या लहान मुलासह गाडीत बसवून पाठवून दिले. मात्र,सुदामने गाडी सोनाराच्या दुकानाकडे न वळवता दुसऱ्याच रस्त्याला नेली. सुदामने महिलेला बहाळ येथे घेऊन गेला व गावाबाहेर झोपडी बांधून महिलेसोबत राहू लागला. "तू कोणाला सांगितलं, तर तुझ्या मुलाला संपवेन" अशी धमकी दिली आणि तिच्यावर बळजबरीने अत्याचार करत होता.

काही दिवसानंतर आरोपी पीडित महिलेला आणि तिच्या मुलाला घेऊन शिरपूर तांडा येथे घेऊन गेला. साधारणतः दोन महिने एका रूममध्ये राहिल्यानंतर १६ जून रोजी आरोपी बाहेर गेल्याची संधी साधत पीडित महिलेने बहिणीचं घर गाठलं. तिने घडलेला सगळा प्रकार बहिणीला सांगितला. त्यानंतर महिलेच्या कुटूंबियांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून संशयित सुदाम भिल याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून, सुदाम याला अटक केली आहे. सहायक निरीक्षक साजिद मन्सुरी तपास करीत आहेत.
इतर बातम्या
गंगापूर धरण

Join Whatsapp Group