गंगापूर धरणातून
गंगापूर धरणातून "इतक्या" पाण्याचा विसर्ग सुरू
img
दैनिक भ्रमर

नाशिक:- गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात, पावसाची संततधार कायम असल्यामुळे आज टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.

सकाळी 8 वाजता गंगापूर धरणातून एकूण 3165 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 

आज सकाळी 9:30 वाजता एकूण 4236 क्युसेक तसेच 
आज सकाळी 10:30 वाजता एकूण 5295 क्युसेक
करण्यात येणार आहे.

पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग टप्या टप्याने वाढवण्यात येईल. नदीकाठच्या नागरिकांनी याची काळजीपूर्वक नोंद घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group