२९ जुलै २०२६
म्हाडा प्रकरणात नाशिक पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केली आहे.
तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी दिलीप कचरू वामन व सेवानिवृत्त मंडळ अधिकारी श्याम एकनाथ बोरसे असे अटक केलेल्या अधिकाऱ्यांचे नाव आहे. या दोघांनी भूमी अभिलेख कार्यालयाकडील बनावट मोजणी नकाशा, हिस्सा फॉर्म नंबर 4,12, गटबुक, जुने झेरॉक्स पत्र यांची पडताळणी/तपासणी न करता तसेच काही प्रकरणांमध्ये तहसील कार्यालयाकडील आदेश/ पत्र नसतांना देखील दोघांनी गुन्ह्यातील विकसक/जमीन मालक/ गुंतवणूकदार यांचेशी संगणमत प्रत्येकी 14 सर्वे/ गटामधील फेरफार नोंदी प्रमाणित/ मंजूर केलेल्या आहेत.
त्यामुळे म्हाडाची व शासनाची फसवणूक झालेली आहे. यादोघांना 27 जुलै रोजी अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांची 7 दिवस पोलीस कोठडी मंजूर केलेली आहे.
Copyright ©2026 Bhramar