मोठी घडामोड ! पंढरपुरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट दिल्लीला रवाना
मोठी घडामोड ! पंढरपुरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट दिल्लीला रवाना
img
Nandini khandare More
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कॉकरोज जनता पार्टी आणि आंदोलकांचा हा मोठा विजय मानला जात आहे. अखेर कॉकरोज जनता पार्टीने आणि आंदोलकांनी जंतर मंतरवर विजय साजरा केला. नीट पेपरफुटीनंतर दिल्लीत जंतर मंतरवर महिन्याभरापासून आंदोलन सुरू होतं. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला नियोजित नागपूर दौरा अचानक रद्द करत थेट दिल्ली गाठले आहे. पंढरपूरचा दौरा आटोपल्यानंतर मुख्यमंत्री नागपूरला रवाना होणार होते. मात्र, ऐनवेळी त्यांच्या दौऱ्यात मोठा बदल झाला असून ते अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री फडणवीस यांची दिल्लीत एक अत्यंत महत्त्वाची तातडीची बैठक पार पडणार आहे. या अचानक ठरलेल्या बैठकीमुळे राज्यातील राजकीय घडामोडींना मोठा वेग आला असून, राज्य आणि केंद्राशी संबंधित काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


दरम्यान , धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि इतके राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर विरोधकांनी धडाधड ट्विट केले आहेत. तर दुसरीकडे तातडीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत.

इतर बातम्या
उद्या

गंगापूर धरण

Join Whatsapp Group