पेठ - नाशिक पेठ गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ वरील पेठ तालुक्यातील सावळघाटात नाशिक कडुन गुजरात कडे जाणारे इको वाहनास पुढील व मागुन येणा-या मालवाहु वाहनांने दोघांचे मध्येच चिरडल्याने गुजरात राज्यातील इको कार क्रमांक जी जे १५ सी आर ५६५९ या वाहनाचा चक्कर होवुन वाहनातील तीन जण जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले असुन त्यास नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास नाशिककडून पेठच्या दिशेने मारुती इको कार (क्रमांक जीजे १५ सीआर ५६५९) जात होती. सावळघाटातील तीव्र उतारावर कार असताना, पाठीमागून येणाऱ्या एका ट्रकचे (क्रमांक एमएच ०४ जीएफ ८९०१) अचानक ब्रेक फेल झाले. ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि हा ट्रक थेट समोरील इको कारवर जाऊन धडकला.
घाटात उतार असल्याने या धडकेच्या वेगामुळे इको कार पुढे चाललेल्या दुसऱ्या एका मोठ्या ट्रकच्या (क्रमांक एनएल ०१ एसी १९२९) मागील बाजूस अतिशय वेगाने जाऊन धडकली . दोन अवजड ट्रकमध्ये चिरडल्या गेल्याने इको कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला.
या भीषण अपघातात कारमधील दोन पुरुष आणि एका महिलेचा घटनास्थळीच अत्यंत वेदनादायक मृत्यू झाला. तर दोन प्रवाशांना गंभीर अवस्थेत तातडीने उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान आणखी एकाचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या ४ झाली आहे. १ जणाची प्रकृती अद्याप गंभीर आहे. मयत व जखमींची नावे समजून घेण्याचे काम सुरू होते.
सावळघाटातील एका अपघाती उताराच्या वळणावर वळण घेते वेळी इकोकारच्या पुढे असणारा ट्रक व पाठीमागून येणारा ट्रक या दोघांमध्ये जबरी धडक होवुन इको वाहन दोघांमध्ये गोळा होवुन चक्काचूर झाले .या अपघाताने महामार्गावरील वाहतूक वरात तास विस्कळीत झाली.
अपघातातील मृत्यु झालेले चौघे गुजरात राज्यातील असून त्यात एक महिला असल्याची माहिती मिळते. त्यांची नावे मात्र समजु शकली नाही.
अपघाताची माहिती मिळताच पेठ पोलीस घटनास्थळी जाऊन अपघात ग्रस्तांना मदत कार्य करत वाहतूक सुरळीत केली.