उद्या
उद्या
img
दैनिक भ्रमर

नाशिक : नाशिक शहरामधील  नाशिक शहर विभाग १ अंतर्गत असलेल्या भद्रकाली विद्युत उपकेंद्रातून निघणाऱ्या ११केव्ही राजे बहाद्दर विद्युत वाहिनीवर तातडीचे  देखभाल दुरुस्तीचे विविध काम करण्यात  येणार असल्याने, उद्या (दि. १८) सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत या वाहिनीवरील भागांचा  वीजपुरवठा बंद राहणार आहे.

यामध्ये मेन रोड, व्यवहारे लेन, रेडक्रॉस सिग्नल, टिळक रोड, घनकर लेन, वकील वाडी, एम. जी. रोड व परिसर याचा समावेश असेल.

देखभाल व दुरुस्तीचे काम नियोजित वेळेअगोदर  पूर्ण झाल्यास  वा वेळ लागल्यास त्यानुसार वीज पुरवठा  सुरू करण्यात येईल. तरी संबंधित ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या नाशिक शहर विभाग १ कडून करण्यात आले आहे.
इतर बातम्या
गंगापूर धरण

Join Whatsapp Group