नाशिक : नाशिक शहरामधील शहर उपविभाग अंतर्गत द्वारका १ कक्ष अंतर्गत द्वारका चौकात महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या वतीने अंडरपास रस्त्याचे काम सुरू असल्याने त्यांच्या महत्वाच्या कामानिमित्त उद्या दि. १ जुलै रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत या परिसरातील १२ रोहित्रांचा वीजपुरवठा बंद राहणार आहे.
यामध्ये बागवान पुरा, द्वारका सर्कल, वडाळा नाका, कपूर मार्केट, मोठा राजवाडा, चौक मंडई, चित्रकूट, कावेरी हॉटेल एरिया, बेले लेन, रेणुका नगर, आझाद चौक व परिसर यांचा समावेश असेल.
देखभाल व दुरुस्तीचे काम नियोजित वेळेअगोदर पूर्ण झाल्यास वीज पुरवठा तात्काळ सुरू करण्यात येईल. तरी संबंधित ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या नाशिक शहर विभाग १ कडून करण्यात आले आहे.