मोठी बातमी !  त्र्यंबकेश्वर देवस्थानचा व्हीआयपी दर्शनाबाबत मोठा निर्णय , काय आहे वाचा
मोठी बातमी ! त्र्यंबकेश्वर देवस्थानचा व्हीआयपी दर्शनाबाबत मोठा निर्णय , काय आहे वाचा
img
Nandini khandare More

श्रावण महिन्याचा पार्श्वभूमीवर  त्र्यंबकेश्वर देवस्थानाने एक मोठा निर्णय घेतला आहे.  बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे देशभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात आणि विशेषतः श्रावण महिन्यात तर त्र्यंबकेश्वरला मोठा भाविक वर्ग येत असतो. याच पार्श्वभूमीवर  श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर देवस्थानने व्हीआयपी दर्शनाबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 

दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दर्शनाबाबत देवस्थान ट्रस्टच्या वतीने काही नियम करण्यात आले आहेत. राज्य शिष्टाचारासंबंधी लेखी पत्रव्यवहाराव्यतिरिक्त अन्य सर्व प्रकारचे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे दर्शन १३ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर या कालावधीत बंद करण्यात आले आहे.

१३ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर व्हीआयपी दर्शन बंद
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होते. त्याचा प्रशासनावर येणारा ताण तसेच निर्माण होणाऱ्या अडचणी आणि प्रश्नांचा विचार करून श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने हा निर्णय घेण्यात आल्याचेसांगण्यात आले आहे. श्रावण महिन्यात मंदिरात होणारी गर्दी आणि भाविकांना दर्शनासाठी लागणारा वेळ लक्षात घेता भाविकांना दर्शनासाठी प्राधान्य देणे आवश्यक आहे.

श्रावण महिन्याच्या अनुषंगाने केंद्रीय, राज्य स्तरावरून अथवा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्राप्त होणाऱ्या राज्य शिष्टाचारासंबंधीच्या लेखी पत्रव्यवहाराव्यतिरिक्त अन्य सर्व प्रकारच्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे दर्शन १३ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर या कालावधीत बंद राहणार आहे. तसेच शासकीय विभागांकडून येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या संख्येवरही विभागनिहाय मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार दररोज केवळ सकाळी ६ ते १० आणि सायंकाळी ६ ते ८ या निश्चित वेळेत अतिमहत्त्वाच्या २० व्यक्तींनाच दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group