आताच्या घडीची मोठी बातमी समोर येत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात झाला असल्याची अपडेट समोर आली आहे. सांगलीमध्ये कडेगावकडून विटा शहराकडे येत असताना ही अपघाताची घटना घडली. या अपघातामध्ये मनोज जरांगेंचा समर्थक जखमी झाले. या जखमींना मनोज जरांगे यांनी स्वत: आपल्या कारमध्ये बसवून रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे हे आज विटा शहरात येणार आहेत. कडेगावकडून ते विटा येथे येण्यासाठी निघाले होते. त्याचवेळी त्यांच्या ताफ्यातील वाहनांना अपघात झाला. दोन ते तीन वाहनं एकमेकांवर धडकली. मनोज जरांगे यांच्या स्वागतावेळी स्वागत मार्गावर प्रचंड गर्दी झाली होती. त्याचवेळी ही अपघाताची घटना घडल्याचे सांगितले जात आहे. या अपघातामध्ये जखमी झालेल्यांना रुग्णालयात नेण्यात आले. हा अपघात नेमका कसा झाला यामागचे कारण समोर आले नाही.
मनोज जरांगे यांचे विटा येथे स्वागत होत असताना तापामध्ये कार्यकर्त्यांना बसने धडक दिल्याने ते जखमी झाले. यावेळी स्वागत न स्वीकारता स्वतः मनोज जरांगे यांनी आपल्या वाहनामध्ये कार्यकर्त्याला बसवून रुग्णालयात दाखल केले. मनोज जरांगे यांनी या जखमी कार्यकर्त्यांची विचारपूस देखील केली.
मनोज जरांगेंचा इशारा जरांगे पाटील यांच्या ताफ्यातील वाहनांना झालेल्या अपघातात जखमी झालेल्या कार्यकर्त्यांना सरकारी रुग्णालयातून विटामधील खासगी रुग्णालयात रवाना करण्यात आले. यावेळी स्वतः जरांगे पाटील यांनी अपघातग्रस्त कार्यकर्त्यांची पूर्ण तपासणी स्वतः थांबून केली आणि या घटनेबाबत माहिती दिली. उपचारासाठी पुढील रुटीन लागल्यानंतर मराठा कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी मनोज जरांगे पुन्हा विटा येतील स्वागत ठिकाणी पोहचले. मात्र त्यांनी स्वागत करून घेतले नाही.