देशभरातील वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर दंडाची रक्कम वसूल झालेली नसल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल ११,३३१ कोटी रुपयांहून अधिक RTO चलान दंड थकीत असल्याचे सांगण्यात आले आहे. यावर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी चिंता व्यक्त करत दंड वसुली आणि वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीबाबत मोठे संकेत दिले आहेत.२०२१ पासून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर आकारण्यात आलेला तब्बल ११,१५० कोटी रुपयांचा दंड अजूनही वसूल झालेला नाही. याबाबत संसदेत माहिती देण्यात आली आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने राज्यसभेत थकबाकीची आकडेवारी सादर केली. जानेवारी २०२१ ते जुलै २०२६ पर्यंत उत्तर प्रदेशात सर्वाधिक सुमारे ११,३३१ कोटी रुपयांची थकबाकी होती, तर दिल्लीमध्ये ही रक्कम सुमारे ११,१५० कोटी रुपये होती. वाहनचालकांनी हा दंड भरण्याकडे पाठ फिरवल्यामुळे शासनाच्या महसुलावर मोठा परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे, या थकीत दंडाच्या बाबतीत राजधानी दिल्लीने संपूर्ण देशात उत्तर प्रदेशपाठोपाठ दुसरा क्रमांक पटकावला आहे.
उत्तर प्रदेशने सर्वाधिक ७.८९ कोटी चलन जारी केली सरकारी आकडेवारीनुसार, उल्लंघनकर्त्यांकडून अंदाजे ४३,००० कोटी रुपयांचा दंड थकीत आहे. ३,६०१ कोटी रुपयांच्या थकबाकीसह तामिळनाडू तिसऱ्या क्रमांकावर आहे. २०२१ पासून जारी केलेल्या ई-चलनांच्या संख्येनुसार, उत्तर प्रदेशने सर्वाधिक ७.८९ कोटी चलन जारी केली आहेत, त्याखालोखाल तामिळनाडू (६.३७ कोटी) आणि दिल्ली (४.७१ कोटी) यांचा क्रमांक लागतो. केरळ ४.५८ कोटी चलनांसह चौथ्या क्रमांकावर आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे वाहन चालविण्याचे परवाने रद्द खासदार संजय सेठ यांच्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, न भरलेल्या दंडाचा वाढता डोंगर हाताळण्यासाठी सरकारने केंद्रीय मोटार वाहन (तिसरी सुधारणा) नियम, २०२६ लागू केले आहेत.
या नवीन नियमांनुसार, जानेवारी २०२६ पासून एका वर्षात पाच किंवा अधिक वेळा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे वाहन चालविण्याचे परवाने रद्द केले जातील. दरम्यान, रस्ते अपघातातील मृत्यूंच्या वाढत्या संख्येबाबत खासदार सुधा मूर्ती यांनी विचारलेल्या दुसऱ्या प्रश्नाला उत्तर देताना नितीन गडकरी यांनी सांगितले की, सरकारने वाहतूक नियमांच्या उल्लंघनासाठीचा दंड वाढवला असून रस्ते आणि वाहने सुधारण्यासाठी पावले उचलली आहेत. लोकांचे वर्तन हेच खरे आणि सर्वात मोठे आव्हान आहे.