आजकाल विवाहबाह्य संबंधांच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. कधी कधी नवऱ्याचं भांड फुटत तर कधी बायकोच, अशा अनेक घटना आजकाल ऐकायला पाहायला मिळतात आता अशीच एक घटना समोर आली आहे . आपल्या नवऱ्याचे एका शिक्षिकेसोबाबत विवाहबाह्य संबंध असल्याचे समजल्यावर महिलेची सटकली आणि तिने शिक्षिका कार्यरत असलेली शाळा थेट गाठली अन शिक्षिकेला चांगलाच धडा शिकवला आहे.
याविषयी अधिक माहिती अशी कि , ही घटना श्रीरामपूर तालुक्यात घडली आहे. भरदिवसा आणि शाळा सुरू असतानाच हा हायव्होल्टेज ड्रामा घडल्याने संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात या प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर परिसरात स्वतःला उच्चशिक्षित पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ता सांगणारा एक तरुण सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. वर्षभरापूर्वी या तरुणाचे परिसरातील एका प्राथमिक शाळेतील शिक्षिकेशी सूत जुळले.. हळूहळू हे प्रकरण इतके वाढले की, हा कार्यकर्ता संबंधित 'मॅडमला' शाळेत सोडणे आणि आणण्यासाठी स्वतःच्या वाहनाने थेट नेवासा फाट्यापर्यंत जाऊ लागला..
रात्री उशिरापर्यंत चालणारे चॅटिंग आणि संशयास्पद हालचालींमुळे कार्यकर्त्याच्या पत्नीचा संशय बळावला. पत्नीने नवऱ्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. अखेर नवऱ्याचे शिक्षिकेशी सुरू असलेले प्रेमप्रकरण उघडकीस आल्याने पत्नीचा संयम सुटला. संतप्त पत्नीने थेट संबंधित शाळा गाठली. वर्गाच्या बाहेर असलेल्या त्या शिक्षिकेला पाहताच पत्नीचा राग अनावर झाला. रौद्ररूप धारण करत तिने थेट शिक्षिकेचे केस पकडत सर्वांसमोरच जाब विचारण्यास सुरुवात केली.
अचानक झालेल्या या प्रकारामुळे शाळेच्या आवारात मोठी घबराट आणि गोंधळ उडाला. लोक गोळा होत असल्याचे पाहून संबंधित शिक्षिकेने तेथून काढता पाय घेतला. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी शाळा बंद ठेवत संबंधित शिक्षिकेला निलंबित करण्याची मागणी केली आहे.