गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर  ‘रामायण’ सिनेमाची पहिली झलक समोर !
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर ‘रामायण’ सिनेमाची पहिली झलक समोर !
img
Nandini khandare More
रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश मुख्य भूमिकेत असलेला चित्रपट ‘रामायण’ प्रदर्शित होण्यापूर्वी खूप चर्चेत आहे.१४ सप्टेंबरला गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी ७:३० वाजता ‘सिया राम’ पोस्टरच्या रिलीजसोबत निर्मात्यांनी चित्रपटाच्या म्युझिकल कॅम्पेनची सुरुवात केली. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर  ‘रामायण’ सिनेमाची पहिली झलक समोर आली आहे. 

नितेश तिवारी दिग्दर्शित या सिनेमात रणबीर कपूर आणि साई पल्लवी मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचा आता पहिला लूक समोर आला आहे. एक टीझर पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. हे टीझर पोस्टर सध्या चर्चेचा विषय ठरला असून अनेकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

रामायण या चित्रपटातील पहिले गाणे ‘जय जय राम’ लवकरच रिलीज होणार आहे. त्याआधी निर्मात्यांनी ‘सिया राम’चे एक मोशन पोस्टर रिलीज केला आहे. उल्लेखनीयबाब म्हणजे ‘रामायणा’चे पहिले गाणे चित्रपटाच्या म्युझिकल कॅम्पेनची सुरुवात असेल.निर्मात्यांच्या मते भगवान गणेशाच्या आशीर्वादाने चित्रपटाच्या म्युझिकल प्रवासाची सुरुवात करणे हे कोणत्याही कामाचे शुभ संकेत आहेत. मोशन पोस्टरचे पार्श्वसंगीतही खूप उत्कृष्ट आहे आणि लोक त्याची प्रशंसा करत आहेत. आता चाहते चित्रपटाच्या पहिल्या गाण्याची वाट पाहत आहेत, जे लवकरच रिलीज होणार आहे.

‘रामायण’चे ‘जय जय राम’ गाणे ए.आर. रहमान यांनी संगीतबद्ध केले आहे आणि त्याचे बोल डॉ. कुमार विश्वास यांनी लिहिले आहेत. अरिजीत सिंह आणि श्रेया घोषाल यांनी या गाण्याला आपला आवाज दिला आहे. हे गाणे ‘रामायण’च्या म्युझिकल कॅम्पेनची सुरुवात आहे, जे चित्रपटाच्या प्रमोशनचा एक महत्त्वाचा भाग असेल. पण त्याआधी ‘सिया राम’ पोस्टरवर एक नजर टाकूया.

इतर बातम्या
Join Whatsapp Group