राज्यात पावसाचा मोठा अलर्ट जारी ! ''या'' जिल्ह्यांना तब्बल 4 दिवस ...
राज्यात पावसाचा मोठा अलर्ट जारी ! ''या'' जिल्ह्यांना तब्बल 4 दिवस ...
img
Nandini khandare More
गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेला पाऊस आता पुन्हा एकदा धो -धो बरसणार असल्याची शक्यता आहे. हवामान विभागाने आता राज्यात पावसाचा मोठा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात मान्सूनचा परतीचा प्रवास अद्याप सुरू झालेला नाही. पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने इशारा दिला होता की, दोन ते तीन दिवस पाऊस नसेल. त्यानंतर आता पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला. हवामान विभागाने 11 ते 14 सप्टेंबरदरम्यान विविध जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. 15 सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, नाशिक, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याचा अंदाज आहे.

काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामानाचा अंदाज पाहून प्रवासाचे नियोजन करावे. मान्सूनचा मुक्काम लांबण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्रातील पावसाची स्थिती पुढील काही दिवस महत्त्वाची ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली आहे. त्यातच पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला.

पाऊस समाधानकारक कोसळत नसल्याने स्थिती गंभीर आहे. काही भागात स्थिती गंभीर आहे. दुष्काळाचे मोठे संकट राज्यातील अनेक भागांमध्ये आहे. अनेक धरणे कोरडी पडली आहेत. जर पाऊस झाला नाही तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. मराठवाड्यातील अनेक नेत्यांनी दुष्काळ जाहीर करावा, असे पत्र शासनाकडे दिली आहेत. मराठवाडा आणि विदर्भात स्थिती गंभीर आहे.

बुलढाणा जिल्ह्यात मागील चाळीस दिवसांपेक्षा जास्त काळापासून पाऊस नाही. परिणामी सोयाबीन पिक वाळले . सोबतच इतर पीक ही वाळली. शेतकरी पावसाची वाट पाहतोय, मात्र पाऊस येत नाही. दररोज पावसाची वाट पाहत असतो. मात्र, पीक वाळली तरीही पाऊस आला नाही. खरीप हंगाम गेला आणि पुढचे पण काही खर नाही. मराठवाडा आणि विदर्भात पावसाने पाठ फिरवली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group