उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद्द रद्द
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद्द रद्द
img
Nandini khandare More
गेल्या अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे गटाला अनेक मोठं मोठे राजकीय हादरे बसत असून आता ठाकरे गटासाठी आणखी एक धक्का बसला असल्याची अपडेट समोर आली आहे. मुंबई महापालिकेतील ठाकरे गटाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद्द रद्द झालं आहे. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द झालं आहे. सरकारच्या नगरविकास विभागाकडून या संदर्भात अधिकृत अधिसूचना जारी झाली आहे. सोमवारी सभागृहात या बाबत घोषणा होईल. विशाखा राऊत या मुंबईच्या माजी महापौर आहेत. शिवसेनेच्या (ठाकरे गट) नगरसेविका विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आल्यामुळे त्यांना पुढील सहा वर्षे नगरसेवक म्हणून निवडणूक लढवता येणार नाही तसचं विद्यमान नगरसेवक पदावरही राहता येणार नाही.

याबाबतची अधिसूचना राज्य सरकारने मध्यरात्री जारी केली. 20 ऑगस्ट रोजी पालघर जात प्रमाणपत्र समितीने विशाखा राऊत यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवलं होतं. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी या संदर्भात 25 ऑगस्ट रोजी माहिती कळवली होती. राजपत्र काढण्याची विनंती केली होती. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर या विरोधात विशाखा राऊत हाय कोर्टात गेल्या होत्या. पण हाय कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली. या निर्णयानंतर त्यांच्या खालोखाल निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या प्रिया सरवणकर यांना नगरसेवकपद मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशाखा राऊत यांनी जातीचे प्रमाणपत्र 14 डिसेंबर 2025 रोजी काढलं असल्याचं समोर आलं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group