'बिग बॉस मराठी ५'चा विजेता सूरज चव्हाणने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. कृष्ण जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर सूरज चव्हाण बाबा झाला आहे. जन्माष्टमीच्या दिवशी सूरजच्या घरी लक्ष्मीचे आगमन झाले आहे. संजणाने गोंडस लेकीला जन्म दिला आहे. ही माहिती देणारा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सूरजला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. 'गुलिगत स्टार'च्या आगमनाने सूरज चव्हाणचे कुटुंबिय आनंदी असल्याचे दिसत आहे. चाहत्यांनी सूरज चव्हाणवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. हॉस्पिटलमधील सूरजचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो बायको संजना आणि लेकीसोबत दिसत आहे.