…तर आता थेट गुन्हाच दाखल होणार ! सीजेपीला मोठा धक्का; मुंबई पोलिसांचा थेट इशारा
…तर आता थेट गुन्हाच दाखल होणार ! सीजेपीला मोठा धक्का; मुंबई पोलिसांचा थेट इशारा
img
Nandini khandare More
दिल्लीतील यशस्वी आंदोलनानंतर आता पुन्हा एकदा cjp एक्शन मोड मध्ये असून कॉक्रोच जनता पार्टीने स्कूल ठीक करो अभियान सुरु केलेलं आहे. याचदरम्यान आता cjp ला मोठा धक्का बसला आहे. 

कॉकरोच जनता पार्टीने देशातील शिक्षणव्यवस्थेत सुधारण घडवून आणण्यासाठी मोहीम चालू केली आहे. सीजेपीचे सदस्य आता देशभरातील शासकीय शाळांना भेटी देत आहेत. शाळांमध्ये जाऊन ते विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत. सोबतच शाळांची स्थितीची पाहणी करून ते संबंधित प्रशासनाला तत्काळ त्रुटी दूर करण्यासाठी भाग पाडत आहेत. सीजेपीच्या या मोहिमेची महाराष्ट्रासह देशभरात चर्चा सुरू आहे. दरम्यान, आता सीजेपीला मोठा धक्का बसला आहे. मुंबई पोलिसांनी सीजेपीला थेट इशारा दिला असून गुन्हा दाखल करू असं स्पष्टपणे सांगितलं आहे.

मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी सीजेपीच्या शाळांना भेटी देण्याच्या मोहिमेवर भाष्य केलं आहे. सीजेपीचे कार्यकर्ते विनापरवानगी शाळेत जात असतील तर आम्ही गुन्हे दाखल करू असा थेट इशाराच त्यांनी दिलाय. सोबतच शाळा, स्कूल, कॉलेज हे विद्यार्थी आणि शिक्षकांचे आहे. त्यांच्या व्यवस्थापनाकडून परवानगी मिळत नसेल तर अशा ठिकाणी सीजेपीच्या नावाखाली आंदोलन केले जाऊ नयेत. अशा स्थितीत शाळेने तक्रार दिली तर आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत, असं देवेन भारती यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, सीजेपीने देशभरातील शाळांना भेटी देण्याचे ठरवलेले आहे. या मोहिमेची सुरुवात सीजेपीचा संस्थापक अभिजीत दीपके याने त्याच्या मूळ गावातून केली. त्याने इतरही काही शाळांना भेटी दिल्या आहेत. या भेटींमध्ये काही शाळांच्या स्वच्छतागृहाची स्थिती वाईट असल्याचे तर काही ठिकाणी वर्गखोल्या खराब असल्याचे समोर आलेले आहे. सीजेपीच्या या मोहिमेमुळे सरकारनेही शासकीय शाळांमध्ये दुरुस्ती करण्याचा विषय प्राधान्यक्रमावर घेतलेला आहे. महाराष्ट्राप्रमाणेच इतरही राज्यांत शासकीय शाळांची स्थिती सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. असे असताना सीजेपीने विना परवानगी शाळेत जाण्याचा प्रयत्न केल्यास गुन्हा दाखल करू असा इशारा मिळाल्यानंतर सीजेपी यावर काय भूमिका घेणार? याकडे समस्त देशाचे लक्ष लागले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group