महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. नियोजित तारखेला होणारी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, आता परीक्षेची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांना आपल्या अभ्यासाचे नियोजन पुन्हा करावे लागणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) ही बातमी प्रसिद्ध केली आहे. आयोगाने महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असून यापूर्वी ही परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 रोजी आयोजित केली जाणार होती. मात्र, आता नव्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा 3 जानेवारी 2027 रोजी राज्यातील सर्व जिल्हा केंद्रांवर पार पडेल.
MPSC Exam New Dates : परीक्षेची जुनी व नवी तारीख
जाहिरात क्रमांक: 017/2026 (दिनांक 25 जून 2026)
जुनी परीक्षेची तारीख: 25 ऑक्टोबर 2026 (प्रचलित Offline OMR पद्धतीने)
नवी सुधारित तारीख: 3 जानेवारी 2027
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पष्ट केले आहे की, परीक्षेचे नियोजन शांततापूर्ण, सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने व्हावे यासाठी विविध प्रशासकीय आणि स्थानिक बाबींचा आढावा घेण्यात आला. परीक्षा पुढे ढकलण्यासाठी खालील मुख्य कारणे विचारात घेण्यात आली आहेत:
> सणांचा कालावधी, स्थानिक परिस्थिती, वाहतूक व्यवस्था आणि उमेदवारांना परीक्षा केंद्रांवर सुरक्षित व वेळेत पोहोचण्यासाठी येणाऱ्या अडचणी.
> राज्यातील विविध जिल्ह्यांमधील परीक्षा उपकेंद्रांची उपलब्धता आणि जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेले अहवाल.
> राज्य सेवा (मुख्य) परीक्षा 2026 चे नियोजन, इतर भरती संस्थांच्या परीक्षांचे वेळापत्रक आणि राज्य शासनाचे हिवाळी अधिवेशन.
परीक्षेचे केंद्र, प्रवेशपत्र , परीक्षेची वेळ आणि इतर आवश्यक सूचना आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध केल्या जातील. अधिकृत संकेतस्थळ: सर्व परीक्षार्थींनी कोणत्याही अस्वाभाविक अफवांवर विश्वास न ठेवता आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला (mpsc.gov.in) नियमित भेट द्यावी.