हल्ली गुन्हेगारीच्या प्रमाणात चिंताजनकी वाढ झाली असून अतिशय किरकोळ अशा वादातून सुद्धा हत्ये सारख्या गंभीर घटना घडत असल्याने आता ही चिंतेची बाब बनत चालली आहे. दरम्यान आता सोन भकांडांमध्ये चक्क मटनावरून वाद झाला आणि या वादाचं रूपांतर भयंकर गुन्ह्यात झालं असून भावनेच भावाचा जीव घेतला असल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथे मटणावरून झालेल्या किरकोळ वादातून भयंकर घडलं. सख्ख्या भावांमध्ये झालेल्या वादानंतर मोठ्या भावाने लहान भावावर कुऱ्हाडीने जीवघेणे वार केले. या हल्ल्यात रमेश श्रीराम बनकर (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी त्यांचा मोठा भाऊ जगन श्रीराम बनकर (वय ६०) याला अटक केली आहे.
जगन, रमेश आणि त्यांचा दिव्यांग भाऊ किशोर हे तिघेही एकत्र राहत होते. रक्षाबंधनानिमित्त त्यांची बहीण घरी आली होती. बहिणीच्या स्वागतासाठी घरात मटणाचा बेत करण्यात आला होता. बहीण राखी बांधून परतल्यानंतर सायंकाळच्या सुमारास उरलेल्या मटणावरून जगन आणि रमेश यांच्यात वाद सुरू झाला.
दोघेही दारूच्या नशेत असल्याने सुरुवातीला झालेला शाब्दिक वाद काही वेळातच विकोपाला गेला. संतापाच्या भरात जगनने घरात असलेली कुऱ्हाड हातात घेतली आणि रमेश यांच्या मानेवर तसेच डोक्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात रमेश गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. कुऱ्हाडीचे वार अत्यंत गंभीर असल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच भिसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून रक्ताने माखलेला मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील कार्यवाही सुरू केली. दरम्यान, भिसी पोलीस आणि शंकरपूर चौकीच्या पोलिसांनी कारवाई करत आरोपी जगन बनकर याला अटक केली आहे. किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद इतका टोकाला गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भिसी पोलीस करत असून, हत्येमागील नेमका घटनाक्रम आणि इतर बाबींचा तपास सुरू आहे.