अभिनेता इम्रान हाश्मीचा ‘आवारापन 2’ हा चित्रपट रिलीज झाला असून या चित्रपटाला चांगले यश संपादन झाले असून आता मात्र इमरान हाश्मीच्या तब्बेतीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
समोर आलेलय माहितीनुसार , रिपोर्ट्सनुसार, इम्रान हाश्मीला स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. त्याची H1N1 टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त आहे. कामासंदर्भात बराच प्रवास त्याने केला, त्यावेळीच त्याची तब्येत बिघडली होती. त्यानंतर त्याने टेस्ट केली असता त्याचे रिपोर्टस पॉझिटिव्ह आले आहेत.
इम्राने रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आल्यानंतर डॉक्टरांनी त्याला आराम करण्याचा आणि योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. असून याबाबत अभिनेत्याकडून कोणतीही अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही