प्रेयसीला वाढदिवसाच्या दिवशी हॉटेलमध्ये नेलं अन.... पुढे घडलं भयंकर
प्रेयसीला वाढदिवसाच्या दिवशी हॉटेलमध्ये नेलं अन.... पुढे घडलं भयंकर
img
Nandini khandare More
आजकाल प्रेमीयुगुलांमध्ये अनेक कारणांवरून होणारे वाद आणि त्यातून होणारे गंभीर गुन्हे यात मोठ्या प्रकरणात वाढ होत असणं आता अशाच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे.  एका तरुणाने प्रेयसीच्या वाढदिवशीच तिची हत्या केली. 

ही घटना  उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये घडली आहे.  या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. तरुणाने प्रेयसीच्या वाढदिवशीच तिची हत्या केली असून शारीरिक वेदनांनी त्रस्त असलेल्या त्या मुलीने त्याच्यासोबत पुन्हा लैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिला होता.वासनेने आंधळ्या झालेल्या त्या प्रियकराने मुलीचे डोके भिंतीवर इतक्या जोरात आपटले की तिच्या डोक्यातून रक्त स्त्राव होऊ लागला. शेवटी तिचा वेदनादायक मृत्यू झाला. 

समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाचे नाव राहुल सिंग आहे. तो फिरोजाबादचा रहिवासी आहे. मृत मुलगी आणि राहुल बारावीपर्यंत एकत्र शिकले होते. ते शाळेत असल्यापासून एकमेकांना ओळखत होते आणि त्याच काळात त्यांचे प्रेमप्रकरण सुरू झाले होते. ती मुलगी एका गरीब  कुटुंबातील होती. तिची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती आणि घरखर्च भागवण्यासाठी तिला खूप संघर्ष करावा लागत होता. आपल्या कुटुंबाची मदत करण्यासाठी आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी, तिने घरच्यांना न कळवता गुडगावला (गुरुग्राम) जाण्याचा निर्णय घेतला होते. तिथे तिने ब्लिंकइट कंपनीत काम करण्यास सुरुवात केली होती. ती आपल्या संघर्षातून आपले आयुष्य पुन्हा उभारण्याचा प्रयत्न करत होती.

गुडगावमध्ये काम करणारी ती तरुणी रक्षाबंधनासाठी फिरोजाबादला आपल्या घरी परत जात होती. त्याच काळात, तिने प्रियकर राहुल सिंगला देखील भेटायचे ठरवले. २६ ऑगस्ट रोजी त्याचा वाढदिवस होता. हा खास दिवस साजरा करण्यासाठी दोघांनी हॉटेलचे बुकींग केले होते. पण राहुलच्या मनात काही वेगळेच विचार सुरु होते. त्याच्याकडे लैंगिक शक्ती वाढवणारी औषधे होती. ही औषधे त्याने हॉटेलमध्ये पोहोचल्यावर घेतली. त्या दोघांनी हॉटेलच्या खोलीत पहिल्यांदा लैंगिक संबंध ठेवले. औषधांच्या परिणामामुळे आणि राहुलच्या क्रूरतेमुळे मुलीची प्रकृती खालावू लागली होती. तिला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला होता. वेदना आणि यातनांनी विव्हळत असलेल्या मुलीने कसेबसे स्वतःला सावरले. तिला वाटले की सर्व काही आता शांत झाले आहे. पण असे झाले नाही.

पहाटे साधारण २ वाजताच्या सुमारास औषधांच्या प्रभावामुळे राहुलने पुन्हा लैंगिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. मुलीची अवस्था आधीच वाईट झाली होती, म्हणून तिने थेट नकार दिला. पण राहुलने तिच्याकडे दुर्लक्ष केले आणि तिच्यावर जबरदस्ती करण्यास सुरुवात केली. मुलीने स्वसंरक्षणासाठी जोरदार प्रतिकार केला तेव्हा राहुलला प्रचंड राग आला. त्याने प्रेयसीचे केस पकडले आणि थेट तिचे डोके भींतीवर आपटले. मुलीच्या डोक्याला दुखापत झाली आणि रक्तस्त्राव सुरु झाला. काही क्षणातच ती बेशुद्ध झाली. त्यानंतर राहुलने मित्राच्या मदतीने तिला रुग्णालयात दाखल केले. पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.

इतर बातम्या
Join Whatsapp Group