नेपाळमध्ये काही दिवसांपूर्वी आलेल्या महापुरामुळे सगळं उद्ध्वस्त झालं. या पुराणे अक्षरशः होत्याच नव्हतं करून टाकलं. पण आता या महापुरातल्या एका घटनेनं देव तरी त्याला कोण मारी या म्हणीची प्रचितीआलिया आहे. . एक महिला तब्बल 11 दिवस अन्न-पाण्याविना होती. तरीदेखील या महापुरात तिचा जीव वाचला असून तिला रेस्क्यू टीमने तिला बाहेर काढलं आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार नेपाळच्या महापुरात बचावलेल्या महिलेचे वय 60 वर्षे आहे. नेपाळमधील नुवाकोट जिल्ह्यातील बेत्रावतीमधील ही घटना असून ती महिला साधारण 11 दिवसांपासून एका घरात बसून होती. 11 दिवस ती कोणीतरी मदतीला धावून येईल, याची वाट पाहात होती. ती महिला ज्या घरात थांबलेली होती, ते घर महापुरात पाण्याखाली गेले होते. नंतर चिखलामुळे ते घर बुजून गेले होते.
चिखलात बुजलेल्या घरात ती महिला जिवंत बसलेली होती. कोणीतरी मदतीला येईल या अपेक्षेने तिचे डोळे बंद असलेल्या दरवाजाकडे होते. दरम्यान, 26 ऑगस्टच्या नैसर्गिक आपत्तीनंतर सध्या नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात रेस्क्यू ऑपरेशन राबवले जात आहे. बचावपथकातील जवानांनी दरवाजा खोलताच समोर जिवंत महिला दिसली. तिला नंतर पिण्यासाठी पाणी देण्यात आले. सध्या तिला बाहेर काढण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या माहपुरात अनेक लोकांचा मृत्यू झालाय. पण तरीही एखादी व्यक्ती जिवंत असेल या आशेपोटी तेथे सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. या ऑपरेशनमध्ये संबंधित महिला जिवंत असल्याचे समोर आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. अजूनही तेथे रेस्क्यू ऑपरेशन सुरूच आहे.