धक्कादायक ! चुलत बहिणीवर तीन भावांकडून लैंगिक अत्याचार अन धमकी; सहा महिन्यांनंतर घटना  उघडकीस
धक्कादायक ! चुलत बहिणीवर तीन भावांकडून लैंगिक अत्याचार अन धमकी; सहा महिन्यांनंतर घटना उघडकीस
img
Nandini khandare More
राज्यात अनेक दिवसांपासून महिला सुरक्षेचा प्रश ऐरणवीर असून महिला आणि मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस चिंताजनक वाढ होत चालली आहे. मात्र दरम्यान आता एक अत्यंत धक्क्कादायक घटना उघडकीस आली आहे. बहीण भावाच्या नात्यावर काळिमा फासणारी घटना ठाणे येथे घडली आहे. ठाण्यात 19 वर्षीय चुलत बहिणीवर तिच्याच तीन भावांनी लैंगिक अत्याचार केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार , 19 वर्षीय चुलत बहिणीवर गेल्या पाच-सहा महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोन भावांना कापूरबावडी पोलिसांनी अटक केली आहे, तर एका अल्पवयीन भावाला ताब्यात घेण्यात आले आहे.

पीडितेच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरवातीला कोपरी पोलीस ठाण्यात नोंदवलेला हा गुन्हा तपासासाठी कापूरबावडी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. न्यायालयात हजर केले असता अटकेतील दोन्ही आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर अल्पवयीन आरोपीची भिवंडी बाल न्यायालयात रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंजुषा भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या सहा महिन्यांपासून ठाण्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये या 19 वर्षीय तरुणीवर तिच्याच तीन चुलत भावांनी लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच दोघांना अटक करण्यात आली आहे. तिसऱ्या अल्पवयीन आरोपीला भिवंडी बाल न्यायालयात पाठविण्यात आल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी काल (गुरुवारी, ता 17) दिली आहे.

पीडितेवर सहा महिन्यांपासून कोपरी तसेच कोलशेत येथील भावांच्या घरातच जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करण्यात येत होता. कुठे वाच्यता केली तर तिला मारण्याची धमकीही त्यांनी दिली होती. धाडस करून तिने अखेर याबाबतची माहिती तिच्या आईला दिल्यानंतर याप्रकरणी कोपरी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. चौकशीत हे सर्व प्रकार कापूरबावडी पोलिस ठाण्याच्या परिसरात घडल्याची बाब समोर आली.

आरोपी भावांकडून सातत्याने दिल्या जाणाऱ्या धमक्यांमुळे पीडित तरुणीने हा प्रकार अनेक महिने कोणालाही सांगितला नाही. मात्र, अखेर धाडस करून तिने आपल्या आईला संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर तिच्या पालकांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला असता, अत्याचाराचे प्रकार वेगवेगळ्या ठिकाणी घडल्याचे समोर आले. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पीडितेच्या तक्रारीनंतर कोपरी पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान घटनास्थळ कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याचे स्पष्ट झाल्याने प्रकरण पुढील तपासासाठी कापूरबावडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, त्यांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर तिसऱ्या अल्पवयीन आरोपीला भिवंडी बाल न्यायालयात पाठवण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंजुषा भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group