जमावाचा अभिनेत्रीच्या गाडीवर हल्ला ! विटांनी फोडल्या कारच्या काचा
जमावाचा अभिनेत्रीच्या गाडीवर हल्ला ! विटांनी फोडल्या कारच्या काचा
img
Nandini khandare More
 आपले आवडत्या सेलेब्रेटींना पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. आपली आवडत्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला बघणे, ऑटोग्राफ घेणे अशी सर्वच चाहत्यांची इच्छा असते परंतु एका अभिनेत्रीला मात्र तिच्या चाहत्यांचं तिच्यावर असलेल प्रेमचांगलाच महागात पडलं आहे. 

बिहारच्या नालंदा जिल्ह्यात भोजपुरी अभिनेत्री काजल राघवानीच्या गाडीवर हल्ला झालाय. हाती आलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री काजल एका शोरूमच्या उद्घाटनासाठी बिहार शरीफ येथे आली होती. या अभिनेत्रीची झलक पाहण्यासाठी जमलेला जमाव अनियंत्रित झाला. या गोंधळादरम्यान, जमावाने तिच्या गाडीवर हल्ला केला. लोकांनी तिच्या 'फॉर्च्युनर' कारच्या खिडकीची काच फोडली.

गाडीवर विटांनी हल्ला घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असूनही काजल राघवानी यांची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या एका अनियंत्रित जमावाने गाडीवर हात आणि विटांनी हल्ला केला. ज्यामुळे गाडीची खिडकी फुटली. मात्र, शोरूम व्यवस्थापकाच्या प्रसंगावधानामुळे काजल राघवानी यांना सुरक्षितपणे तिथून बाहेर काढण्यात यश आले; त्या बाहेर येताच चालकाने गाडी वेगाने त्या भागातून बाहेर नेली.

गर्दी नियंत्रणाबाहेर गेली काजल राघवानी यांच्यासोबत असलेल्या बाउन्सरनी सांगितले की, पाटण्याहून १२-१३ बाउन्सर आलेले असूनही गर्दी प्रचंड होती. त्यामुळे अभिनेत्रीला सुरक्षा कडे तयार करून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. आणखी एका बाउन्सरने गर्दीच्या प्रचंड प्रमाणाचा उल्लेख करत सांगितले की, मागील दरवाजातून त्यांना बाहेर काढताना खूप कसरत करावी लागली, कारण बाहेर त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता.
इतर बातम्या
Join Whatsapp Group