Toxicमध्ये कियाराचे इंटिमेट सीन्स !  सिद्धार्थ मल्होत्राने केली पोस्ट; म्हणाला, हे सर्व काही..
Toxicमध्ये कियाराचे इंटिमेट सीन्स ! सिद्धार्थ मल्होत्राने केली पोस्ट; म्हणाला, हे सर्व काही..
img
Nandini khandare More
बहुप्रतिक्षीत ‘टॉक्सिकः ए फेयरीटेल फॉर ग्रोन अप्स’ सिनेमाचा बोलबाला सर्वत्र असून सध्या जास्त चर्चा आहे ती  ‘टॉक्सिकमधील तबाही गाण्याची अंडी त्यामध्ये कियारा अडवाणी हीने दिलेल्या इंटिमेट सीन्सची, या गाण्यामुळे कियारा मोठ्याप्रमाणात ट्रॉल झाली असून आता तिचा पती सिद्धार्थ मल्होत्रा याने एक पोस्ट केली आहे. 

कन्नड सुपरस्टार यश याचा बहुप्रतिक्षीत ‘टॉक्सिकः ए फेयरीटेल फॉर ग्रोन अप्स’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सिनेमाचं ट्रेलर आता सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे, त्यामागे कारण देखील तसं आहे. सिनेमात यश याचा भन्नाट अंदाज चाहत्यांना थक्क करत आहे. या क्राईम थ्रिलरमध्ये यश दोन भूमिका साकारताना दिसणार आहे. ट्रेलरमध्ये यशची झलक चाहत्यांना घायाळ करत आहे. तर अभिनेत्री कियारा देखील सिनेमामुळे तुफान चर्चेत आहे. सागंयाचं झालं तर, ‘टॉक्सिक’ (Toxic) या सिनेमातील ‘तबाही’ (Tabahi) हे पहिलं गाणं देखील प्रदर्शित झालं असून, त्यात यश आणि कियारा यांच्यातील जबरदस्त केमिस्ट्री दिसून आली आहे.

मात्र, यातील काही इंटिमेट सीनमुळे कियाराला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीत, सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर कियाराला तिचा पती सिद्धार्थ मल्होत्राचा पाठिंबा मिळाला आहे; ‘टॉक्सिक’चा ट्रेलर शेअर करताना सिद्धार्थने कियाराच्या अभिनयाचे भरभरून कौतुक केलं. सध्या सिद्धार्थ याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

                                                                      

इन्स्टाग्रामवर ‘टॉक्सिकः ए फेयरीटेल फॉर ग्रोन अप्स’ सिनेमाचा ट्रेलर शेअर करत सिद्धार्थ याने बायकोच्या अभिनयाचं कौतुक करत सिनेमाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहे. अभिनेता पोस्ट करत म्हणाला, ‘परिश्रम, समर्पण आणि जिद्द… हे सर्व काही मोठ्या पडद्यावर पाहायला मिळेल. Ki हा तुझा सर्वोत्तम सिनेमांपैकी एक ठरणार आहे!! गीतू मोहनदास, यश, तू आणि संपूर्ण टीमने निर्माण केलेली जादू पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. ‘टॉक्सिक’टीमला खूप खूप शुभेच्छा. 26 ऑगस्टची आतुरतेने वाट पाहत आहे.’

सांगायचं झालं तर, सिद्धार्थची प्रतिक्रिया अशा वेळेस समोर येत आहे, जेव्हा कियारा यश याच्यासोबत दिलेल्या इंटिमेट सीनमुळे वादाच्या भोवऱ्यात आहे. सिनेमात यश, कियारा अडवाणी, नयनतारा, हुमा कुरेशी, तारा सुतारिया आणि रुक्मिणी वसंत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यशच्या करिअरमधील हा 19 वा चित्रपट असून ‘केजीएफ’च्या सीरिजनंतरचा हा त्याचा पहिलाच प्रोजेक्ट आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group