मोठी बातमी ! अभिजीत दिपके अडचणीत ;  नेमकं काय घडलं ?
मोठी बातमी ! अभिजीत दिपके अडचणीत ; नेमकं काय घडलं ?
img
Nandini khandare More

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांच्या नीट पेपरफुटीच्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा असून cjp च्या आंदोलनामुळे 
सरकारला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला.  यानंतर सर्वच स्तरारून अभिजित दिपके यांची चर्चा हिट असून आता मात्र अभिजित दीपके एका कारणाने अडचणीत आले आहेत.  अभिजीत दिपके यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी कॉकरोच जनता पार्टीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला देशभरातून महत्वाच्या पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात आले. मात्र, अभिजीत दिपके यांच्यावरच गंभीर आरोप झाली.

अभिजीत दिपके यांच्या या निर्णयाविरोधात दोन युवक गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषणाला बसली आहेत. आता यांची तब्येत खालावली असून त्यांना रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. CJP बैठकीविरोधातील आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. मनीष ब्रह्मभट्ट आणि राहुल पांडे हे दोघे उपोषणाला बसले. आता त्यांची प्रकृती खालावली आहे. प्रकृती बिघडल्याने दोघांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

CJP टीम लोकशाही पद्धतीने तयार करण्याची आंदोलकांची मागणी आहे. अभिजीत दिपके यांच्यावरही आंदोलकांनी गंभीर आरोप केले. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला. आता अभिजीत दिपके यांच्या समस्यांमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. मनीष ब्रह्मभट्ट आणि राहुल पांडे यांचे गेल्या चार दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू आहे.

चार दिवसांच्या उपोषणामुळे प्रकृती खालावल्याने दोघांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. CJP ची टीम लोकशाही पद्धतीने आणि सर्वसमावेशक पद्धतीने तयार करावी, अशी आंदोलकांची मागणी आहे. या आंदोलकांकडून सातत्याने अभिजीत दिपके यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. त्यातच आता त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळतंय.
इतर बातम्या
Join Whatsapp Group