देवळा : येथील देवळा - मालेगाव रस्त्यावर फॉरेस्टच्या अलीकडे असलेल्या पिंपळगाव च्या वळणावर शुक्रवारी दि ७ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास इर्टीगा कार व मोटारसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाले . या अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते सह इतर सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातात ठार झालेल्या दोन्हीं जणांना देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले . या घटनेने परीसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .देविदास पांडुरंग ठाकरे (वय 26 ) व कैलास पुंडलिक देवरे (वय 55 ) अशी मृत झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की , शुक्रवारी दि ७ रोजी सायंकाळी५ वाजेच्या सुमारास देवळा मालेगाव रस्त्यावर पिंपळगाव (वा.) च्या वळणाजवळ देविदास पांडुरंग ठाकरे (वय 26 ), कैलास पुंडलिक देवरे (वय 55 ) दोन्ही राहणार धोबीघाट, दहिवड तालुका देवळा हे हिरो मोटारसायकल( क्रं एम एच 41 बी एस 3152) ने दहिवडकडून देवळ्याकडे येत असताना मारुती अर्टिगा कार ( क्रं एम एच 04 एच यू 1283) ही गाडी देवळ्या कडून दहिवड कडे जात असताना या दोन्ही वाहनांमध्ये भीषण अपघात घडला.
मोटरसायकल वरील दोन्ही जण जागीच ठार झाले . ,हा अपघात इतका भीषण होता की मारुती अर्टिगा कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे . या अपघाताचा देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून,अधिक तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते